बातम्या संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभेसाठी २३ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार… April 19, 2024April 19, 2024 Editor सखी न्यूज लाईव्ह – सायली कुलकर्णीमी भूमिका बदलणारा कार्यकर्ता नाही : संजोग वाघेरेलोकसभा निवडणुकीनंतर मी माझी भूमिका बदलणार नाही. योग्य भुमिकेतून लोकशाहीच्या वाचविण्याच्या विचारास ओढत मी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी श वचन दिले आहे. मी वाघेरे पाटील कुटुंबातून आलो आहे. मी सर्वसामान्यांसोबत जोडलेला कार्यकर्ता आहे. सर्व समाजातील घटक माझे भाऊबंद आहेत, असे संजोग वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केले.राम मंदिरापेक्षा महागाई, बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे : मानव कांबळेराम मंदिर, 370 कलम हे विषय सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचे नाहीत. महागाई, बेरोजगारी, महिला व अल्पसंख्याकांवरील वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मणिपूर येथील अमानुष्य अत्याचार या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या हितासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने आम्ही संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत आहोत, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले.गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली : कैलास कदमकामगार कायदे बदलून कामगार वर्गच संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळवडे येथील आगीच्या दुर्घटनेत 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला. त्यांना सत्ताधारी भाजपने नुकसान भरपाई दिली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या भाजपच्या सभापतीला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ते जेलची हवा खावून आले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. भाजपा देश आणि संविधान विरोधी आहे. हे रोखण्यासाठी आम्ही संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी आहोत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.हुकुमशाहीला नागरिक मतातून उत्तर देणार : चेतन बेंद्रेईडी आणि सीबीआयचा वापर करून भाजपाने देशभरात दबावतंत्र सुरू केले आहे. त्याचा वापर करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबले आहे. हुकुमशाही मोदी सरकारला नागरिक मतातून उत्तर देतील. मावळ लोकसभेत महिला व आयटी विभागाची जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत, असे आपचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.मोदी सरकार विरुद्ध जनता अशीच निवडणूक : ज्योति निंबाळकरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही शहरात प्रचार करत आहोत. प्रचारात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. देशातील सरकार बदलाचा नारा सर्वत्र दिला जात आहे. मोदी सरकार विरोधी जनता अशीच ही निवडणूक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा ज्योति निंबाळकर म्हणाल्या.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात आणखी आघाडी घेणार: योगेश बाबरमहाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन केले आहे. सर्वांना जबाबदार्या विभागून देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा जोर आणखी वाढेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे बारामती लोकसभेच्या बैठकीस गेल्याने ते आले नाहीत, असे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले.संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभेसाठी २३ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार… Post Views: 85