पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये ‘महिला दांडिया’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : नवरात्रीचा उत्साह, गरब्याचा ताल आणि दांडियाच्या ठेक्यावर थिरकणाऱ्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात पुणे लोकमान्य फेस्टिवलअंतर्गत आयोजित ‘रास रिदम गरबा नाईट’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गंमत जंमत इव्हेंट्स निर्मित आणि चैताली माजगावकर-भंडारी प्रस्तुत या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला.महिलांसाठी विशेष आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लाईव्ह दांडिया ऑर्केस्ट्राने विशेष रंगत आणली.

संगीताच्या तालावर महिलांनी गरबा आणि दांडियाचा मनमुराद आनंद घेतला. उत्सवी वातावरण, दांडियाचा नाद आणि नृत्याचा उत्साह यामुळे संपूर्ण कार्यक्रमस्थळी चैतन्य निर्माण झाले होते.नवरात्रीच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करत महिलांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी दांडियाच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाची रंगत वाढवली. लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या संगीताने उपस्थितांचा उत्साह अधिकच वाढला. मनोरंजनासोबतच महिला सहभाग आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.गंमत जंमत इव्हेंट्सच्या निर्मितीतून आणि चैताली माजगावकर-भंडारी यांच्या प्रस्तुततेतून साकारलेल्या ‘रास रिदम गरबा नाईट’ने पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष रंगत आणली.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि जल्लोषपूर्ण वातावरणामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.या कार्यक्रमाची माहिती पुणे लोकमान्य फेस्टिवलचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली.
