पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक
महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा निर्धार – आमदार प्रसाद लाड

पिंपरी चिंचवड, 17 ऑक्टोबर 2026 : आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे नियोजन, रणनीती आणि मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आज पिंपरी विधानसभेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा सर्व पदाधिकाऱ्यांची युवा मोर्चाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पिंपरी विधानसभा प्रभारी तथा आमदार श्री. प्रसादजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी आमदार श्री. अमित गोरखे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिताताई जाधव (पुणे पदवीधर मतदारसंघ) आणि श्री. कौस्तुभ गावडे (पुणे शिक्षक मतदारसंघ) यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
प्रमुख उपस्थिती
या बैठकीस पिंपरी विधानसभा प्रभारी आमदार श्री. प्रसादजी लाड, सहप्रभारी आमदार सौ. स्नेहाताई दुबे, आमदार श्री. अमित गोरखे, आमदार सौ. उमाताई खापरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्नजी (बापू) काटे, आणि पिंपरी-चिंचवड शिक्षक मतदारसंघ निवडणूक संयोजक श्री. सदाशिवजी खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गांभीर्याने काम करण्याचे आवाहन
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर गांभीर्याने काम करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यावर भर दिला जावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत पक्षाचे सरचिटणीस श्री. मोरेश्वर शेंडगे, सरचिटणीस सौ. सोनालीताई हिंगे, सरचिटणीस श्री. मधुकर बच्चे, पिंपरी चिंचवड शिक्षक व पदवीधर निवडणूक संयोजक श्री. राजेश पिल्ले, सर्व निवासी पदाधिकारी तसेच पिंपरी विधानसभेतील मंडल अध्यक्ष श्री. धरम वाघमारे, सौ. अनिताताई वाळुंजकर, श्री. जयदीप खापरे, श्री. मंगेश धाडगे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आदरणीय ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार नोंदणी वाढवणे, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि प्रचाराची प्रभावी आखणी करणे या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीचे आयोजन युवा मोर्च्याचे अध्यक्ष श्री. दिनेश यादव, सरचिटनीस श्री. राहुल खाडे, प्रदेश सचिव श्री. सुमित घाटे, श्री. दिनेश काटे, श्री. गणेश सस्ते, साची दोशी, श्री. प्रसाद कस्पटे, श्री. राजेश डोंगरे, श्री. अजित कुलथे, श्री. सम्यक साबळे यांनी केले होते.
