शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षण शिक्षकांचा सत्कार

पिंपरी : ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघ, निगडी यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. सौ. शर्मिलाताई राजू बाबर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अशा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबनाची दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत यावेळी मा. उपमहापौर सौ. शर्मिलाताई राजू बाबर यांनी व्यक्त केले.

यावेळी ब्रह्मदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कांबळे, शिक्षक रविंद्र जोशी, मालती तिडके, सेविका सविता रोडे व प्रतीक कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघाचे अध्यक्ष सुरेश कारंडे, उपाध्यक्ष शंकर होनकळस, सचिव गजानन श्रीखंडे, खजिनदार चंद्रकांत तेली तसेच सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर होनकळस यांनी केले, तर आभारnचंद्रकांत तेली यांनी मानले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
