बातम्या *फुगेवाडीकरांचा निर्धार; अण्णा बनसोडेच आमचे परमनंट अण्णा* November 8, 2024 Editor पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी)Sakhi news live Sayali Kulkarni राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी (दि. 7) फुगेवाडी, कुंदननगर परिसरात पदयात्रा काढली. घराघरात तसेच गणेश मंडळांना, मंदिरांना भेटी देऊन त्यांनी जनतेचे आशीर्वाद घेतले. यावेळी तरुणाईचा उल्लेखनीय सहभाग होता. ‘फुगेवाडीकरांचा निर्धार अण्णाच आमचे परमनंट आमदार’ अशा प्रकारच्या घोषणांनी फुगेवाडी परिसर दणाणला.यावेळी स्वाती काटे, प्रतिभा जवळकर, वैशाली वाखारे, हौसाबाई वाखारे, सोनाली सायकर, संध्या गायकवाड, सागर फुगे, सतीश लांडगे, रघुनाथ जवळकर, संदीप फुगे, गणेश फुगे, ओंकार वाखारे, संजय काटे, बाबासाहेब दळवी, मनोज वाखारे, हरिष पुजारी, सिकंदर सूर्यवंशी, हाजीभाई शेख, बादशहाभाई शेख, संजय गरुड, नंदु काची, यासीन सारवा, सोपानराव फुगे, तुषार फुगे, सुभाष डोळस, अनिकेत डोळस, स्वप्निल फुगे, ओम फुगे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.फुगेवाडी आणि कुंदन नगर परिसरात आमदार अण्णा बनसोडे यांनी मोहनसिंग कोहली, विपिन फुगे, प्रकाश कालेकर, संदीप फुगे, मनोहर वाखारे, अजय साळुंखे, शंकर हुलावळे, हनुमंत फुगे, नथूभाऊ फुगे, हभप सोपान महाराज मुळे, प्रवीण गणपत गायकवाड, प्रशांत फुगे, संदीप बेलसरे, प्रशांत फुगे, संध्या गायकवाड, संदीप लांडे, सुरेश गादिया, कपिल अग्रवाल, शाम लांडे, आप्पा मारणे, आकाश गायकवाड यांच्या घरी भेटी दिल्या.फुगेवाडी मशीद, संजय नगर बौद्ध विहार, आझाद हिंद मित्र मंडळ, गणेश मंडळ, नवरंग मंडळ, स्टार चौक मंडळ, महाराणा प्रताप मंडळ, आझाद मंडळ, वेताळबाबत चौक मंडळ, साईनाथ तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, सुभाष तरुण मंडळ, भारत नगर मित्र मंडळ, हनुमान मंदिर, दत्त मंदिर कुंदननगर, मैत्री अपार्टमेंट, मायानगरी अपार्टमेंट, राधिका रेसिडेन्सी, कुणाल पुरम हाऊसिंग सोसायटी, येथेही आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.अण्णा बनसोडे यांच्या भेटीदरम्यान फुगेवाडी आणि कुंदननगर मधील तरुणांनी अण्णाच आमचे परमनंट आमदार, असा निर्धार केला. ठीक ठिकाणी महिलांनी आमदार बनसोडे यांचे औक्षण करून स्वागत केले. Post Views: 51