पिंपरी चिंचवडबातम्या

आंबेगावातील जैदवाडीच्या ठाकरवस्तीपर्यंत पोहोचला मदतीचा हात

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
– भाजपाचे स्वप्नील काळे आणि राहुल राजपूत यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील जैदवाडी येथील ठाकरवस्तीतील गरजू आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला. भाजपा युवा मोर्चाचे सचिव स्वप्नील काळे आणि भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव राहुल राजपूत यांनी या वाटपासाठी पुढाकार घेतला.

वाढदिवसानिमित्त होणारा शुभेच्छा फलक, हार-तुरे आणि सत्कारांचा खर्च टाळून ती रक्कम गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याच्या भूमिकेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी त्याचा शुभारंभ झाला. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी व दुष्काळग्रस्त गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे. न्यूज पीसीएमसी….

या मोहिमेअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील नानवडे येथेही १०० गरजू आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते. जैदवाडीतील कार्यक्रमातून ठाकरवस्तीतील कुटुंबांपर्यंत अन्नधान्याची मदत पोहोचली आहे.
****
प्रतिक्रिया :

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावात जाऊन गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष मदत करावी, या भावनेतून आम्ही जैदवाडीच्या ठाकरवस्तीची निवड केली. रोजच्या जेवणासाठी लागणारे अन्नधान्य या कुटुंबांपर्यंत पोहोचवता आले, याचे समाधान आहे.”
प्रतिक्रिया :
– स्वप्नील काळे, सचिव, भाजपा युवा मोर्चा.
*****
प्रतिक्रिया :
“घरखर्च सांभाळताना अन्नधान्यासाठी करावी लागणारी तजवीज अनेक कुटुंबांसाठी मोठी असते. अशा वेळी मिळालेली मदत त्यांना दिलासा देते. ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमातून जैदवाडीच्या ठाकरवस्तीतील कुटुंबांच्या दैनंदिन गरजेला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न होता.”
– राहुल राजपूत, सचिव, भाजपा कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य.