सामाजिक बांधिलकी जपत आमदार अमित गोरखे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावे व आदिवासी पाड्यांना मदत, अन्नधान्य कीट वाटप

पिंपरी-चिंचवड, 02 नोव्हेंबर 2026 : वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळत, लोकप्रतिनिधींनी समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव कशी ठेवावी, याचा उत्तम आदर्श विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी घालून दिला आहे. यंदा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता, त्यांनी मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावे व आदिवासी पाड्यांवर दिवाळीच्या अनुषंगाने अन्नधान्य कीट वाटप करण्याचा अत्यंत स्तुत्य आणि जनहितकारी निर्णय घेतला आहे. त्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्या निर्णयाचे कौतुक वर्षाव होत असून, हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना आनंद देणारा ठरत आहे.
कौतुकास्पद सामाजिक उपक्रम
राज्यात निर्माण झालेली गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेले संकट, या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून एकात्मिक आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा निर्णय आमदार अमित गोरखे यांनी घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याऐवजी या दुष्काळग्रस्त व संकटात सापडलेल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, या कठीण काळात आदिवासी बांधव व दुर्गम भागातील लोकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आदिवासी पाड्यांवर दिवाळीचा फराळ, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक साहित्याच्या किट्स मोठ्या प्रमाणावर पाठवल्या आहेत.
संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात
सध्या राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदापेक्षा समाजबांधवांच्या आणि बळीराजाच्या वेदना समजून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत, आमदार अमित गोरखे यांनी हा साधा आणि लोकोपयोगी मार्ग निवडला आहे.
आमदार अमित गोरखे यांचे जनतेला आवाहन
वाढदिवसावर होणारा खर्च टाळून तो पैसा दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजूंपर्यंत पोहोचवणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. आज आपला अन्नदाता असलेला बळीराजा संकटात आहे. आपण सर्वांनी मिळून या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवेचा वसा अधिक बळकट करत, यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांसोबत साजरी करण्याचा आमचा मानस आहे. सर्वांनी आपापल्या परीने शक्य ती मदत करून बळीराजाची दिवाळी गोड करावी, असे आवाहन मी करतो. – आमदार अमित गोरखे
