पिंपरी चिंचवडबातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटांची पाहणी

गणेशभक्तांच्या सुरक्षित व सुकर विसर्जनासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मा. विरोधी पक्षनेते श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या सूचना.

पिंपरी चिंचवड : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो मंदिराशेजारील घाट तसेच परिसरातील सर्व विसर्जन घाटांची मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य, विद्युत तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.


यावेळी विसर्जन घाट परिसरातील स्वच्छता व साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना श्री. नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच परिसरातील लाईट व विद्युत खांबांची तपासणी करून विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी फ्लड लाईट्स बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या.


घाटाची आवश्यक दुरुस्ती व डागडुजीची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले. गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुकर व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यावर श्री. नाना काटे यांनी यावेळी भर दिला.


गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने नागरिक व गणेशभक्त विसर्जन घाटांवर येत असल्याने स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, घाटांची सुरक्षितता आणि आवश्यक मूलभूत सुविधा यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


याप्रसंगी स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. सुनील दांगडे,श्री.संजय बंडगर, तसेच कनिष्ठ अभियंता जाई जाधव, श्रीमती समृद्धी पाटील, आश्लेषा सानप, श्री.अमित पवार, आरोग्य निरीक्षक श्री. प्रणय चव्हाण, श्री. गणेश राजगे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बाप्पुसाहेब रोकडे, वीज पर्यवेक्षक श्री. राहुल संभु, श्री. असिफ शेख तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार, नागरिक उपस्थित होते.