Saturday, October 17, 2026
Latest:
पिंपरी चिंचवडबातम्या

महापालिकेच्या उद्यान विभागाकडून काढण्यात आलेली नवीन वृक्ष गणनेची निविदा तात्काळ रद्द करणे व पूर्वीच्या वृक्ष गणनेचे काम पुर्ण करून घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा* – रविराज काळे आप 

​पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने शहरात नव्याने वृक्ष गणना करण्यासाठी जीआयएस (GIS) जीपीएस (GPS) आधारित मॅपिंगच्या माध्यमातून नवीन निविदा प्रसिद्ध केल्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयाला आम आदमी पार्टी युवक आघाडी तीव्र विरोध दर्शवत असून खालील मुद्दे निदर्शनास आणू इच्छितो 

यापूर्वी ‘टेरॅकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी एजन्सीमार्फत सॅटेलाइटद्वारे शहरात वृक्ष गणना करण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेचे सुमारे ६ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले. जर यापूर्वी एवढी मोठी रक्कम खर्च करून वृक्ष गणना पूर्ण झाली नाही तर आता पुन्हा नव्याने कोट्यवधी रुपयांची निविदा काढून तीच प्रक्रिया करण्याची काय गरज भासली आहे?पूर्वीची वृक्ष गणना प्रत्यक्षात पूर्ण झालेलीच नव्हती, तर संबंधित ठेकेदार एजन्सीला संपूर्ण ६ कोटी ७६ लाख रुपयांचे बिल का अदा करण्यात आले? यावरून पूर्वीच्या कामात महापालिकेची मोठी फसवणूक झाल्याचे किंवा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट दिसते.

​आमच्या मागण्या –

1)शहरात नव्याने काढण्यात आलेली वृक्ष गणनेची निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी.

2) जुन्या ठेकेदाराकडून काम पुर्ण करून घ्यावे.​अन्यथा अदा करण्यात आलेली रक्कम वसुल करावी. यापूर्वी वृक्ष गणना झाली नसेल किंवा ती सदोष असेल, तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याला देण्यात आलेली संपूर्ण रक्कम तात्काळ वसूल करण्यात यावी.

 3) उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संगनमताने हे बिल मंजूर केले गेले, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून हे पैसे त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावेत.

4) महापालिका आणि पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्या जनतेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार एजन्सी आणि उद्यान विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावेत.

​जरी महापालिकेने या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही आणि नवीन निविदा रद्द केली नाही, तर आम आदमी पार्टी युवक आघाडी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा रविराज काळे यांनी दिला.